लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एका महिलेला तिचे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी त्याने उकळत्या तेलातून ५ रुपयांचे नाणे काढण्याच्या शिक्षेबाबतचा व्हिडीओ पाहिला. ही शिक्षा एक प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचाराचा एक प्रकार आहे. म्हणून मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे माहिती कळविलेली आहे. असे उकळत्या तेलातून नाणे काढणे अशी शिक्षा देणारे समाजकंटक आहे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, महिलेला संरक्षण आणि सहकार्य मिळाले पाहिजे. समुपदेशन मिळाले पाहिजे. या सगळ्या मुद्द्यांच्याबरोबर असा व्हिडीओ काढत असताना दहशत पसरवण्याचा हेतू होता. त्याच्यावरती पण कुठेतरी लोकांच्या मनात जागृती करणारे निर्णय झाले. लवकरच गृहमंत्र्यांनी या प्रश्नांवर बैठक घ्यावी, असे सुचवले आहे.