पुणे : कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाने बेदम मारहाण केल्याचं प्रकरण समोर आल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. मुंबईत, महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसांना अतिशय तुच्छ वागणूक देणारे अनेक प्रकार यापूर्वीही घडले असून असाच प्रकार पुन्हा घडल्याने मराठी माणूस महाराष्ट्रातच असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाचे अधिवेशनातही पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाबाबत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तर अशा लोकांचा कडेकोट बंदोबस्त केला जाईल असा इशारा उदय सामंत यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिलाय. मराठी माणसाला जर मारहाण होत असेल तर कारवाई करू. महाराष्ट्र सगळ्या जातींना घेऊन चालणारे राज्य असल्याचे ते यावेळी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील उद्योगाबाबत बोलताना सावंत म्हणाले, महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास देत असेल तर त्यावर कारवाई करू. सर्व उद्योगांना संरक्षण देण्याचे आमचं काम आहे. राज्यभर उद्योग भवन उभारण्याचं काम हाती घेणार आहोत. गडचिरोली सारख्या जिल्हयात अनेक कंपन्या आणल्या. मराठवाड्यात देखील अनेक गुंतवणुकी आम्ही आणल्या आहेत. संभाजी नगरध्ये अनेक प्रकल्प आम्ही आणले आहेत. माझ्या मतदार संघात देखील एक मोठा कारखाना येत आहे. त्याचं काम सूरू झालं आहे. पुणे, गडचिरली, रत्नागिरी, कल्याण डोंबिवली या जिल्ह्याला टाटा समूहाकडून सीआरएसमधून ५०० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत.
उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. या विरोधकांच्या वक्तव्यावर सामंत यांनी यावेळी निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधकांनी फेक नऱ्हेटिव सेट केला होता. उद्योग कुठलेच राज्याबाहेर गेले गेले नाहीत. त्यांच्या काळात काम झाल नाही. म्हणुन हे प्रकल्प बाहेर गेले. चर्चा न झाल्याने त्यांच्या काळात एयर बस हा प्रकल्प गेला. याबाबत व्हाईट पेपर का काढला नाही असं सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आमच्या अनेक मंत्र्यांना बंगले दिले गेले आहेत. आणि फ्लॅट सुद्धा दिले गेले आहेत.आमच्या मध्ये बंगल्यावरून वाद होणारं नाही हे नक्की आहे. शिवसेना पुणे महानगरपालिकेत सत्तेत येईल असेच काम करू. पुण्याचा महापौर आमच्या विचाराशिवाय होणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तानाजी सावंत मला सिनियर आहेत. मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील त्यांची नाराजी नक्की दूर करू आमचं कुटुंब आहे. एकनाथ शिंदे कुटुंबप्रमुख आहेत बीड आणि परभणी बद्दल बाकीच्यांचं मला माहिती नाही. आम्हीं शेवटच्या आरोपींपर्यंत पोहोचू, त्यांना नक्की न्याय मिळेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.