कोरेगाव भीमा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमात गेले दोन दिवस अँटिजेन टेस्ट करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ग्रामपंचायतीला यश आले नाही. गावात औषधफवारणी व संचारबंदीचे काटेकोर पालन व आठवडे बाजर बंद केल्याने मोठ्या लोकसंख्येच्या गावातही कोरोनाला अटकाव घालता येऊ शकत असल्याचे सरपंच अमोल गव्हाणे यांनी सांगितले.
प्रांताधिकारी संतोषकुमर देशमुख यांनी शिरुर तालुक्यातील १४ हॉटस्पॉट गावांमध्ये अँटिजेन टेस्ट तपासण्या वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे व जालिंदर मारणे यांनी हॉटस्पॉटमधील प्रत्येक गावात जाऊन आरोग्य कर्मचारी व आशासेविकांच्या सहकार्याने भाजी मंडई, तसेच दुकानदारांच्या अँटिजेन तपासण्या केल्या. यात या गावांमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण मिळून आले. या वेळी कोरेगाव भीमा येथे आरोग्य केंद्राचे जालिंदर मारणे यांच्यासह सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, महेश ढेरंगे, भाजपाचे संपत गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, राजेंद्र गवदे, विनायक गव्हाणे, भाऊसाहेब लोहार, आरोग्य कर्मचारी संतोष थिटे, आशासेविका अमृता गव्हाणे, सुनीता पाटील, सोनाली राऊत , मंगल खरात आदी उपस्थित होते.
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोगय केंद्रातील १० गावांमध्ये १०३ नवे कोरोना संक्रमीत रुग्न आज एकाच दिवसात सापडले असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
४०० जणांची केली अँटिजेन टेस्ट
तळेगाव ढमेढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरेगाव भीमा येथे १४० अँटिजेन टेस्टमध्ये ४ कोरोना संक्रमित रुग्ण, तळेगाव ढमढेरे येथे १६२ टेस्टमध्ये ६४ कोरोना संक्रमित रुग्ण, सणसवाडी येथे ९८ टेस्टमध्ये ३१ कोरोना संक्रमित रुग्न शोधन्यात यश आले असुन यापुढिल काळातही अँटिजन टेस्ट सुरु राहणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले.
०५ कोरेगाव भीमा
नागरिकांची अँटिजेन तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी समवेत सरपंच अमोल गव्हाणे व इतर पदाधिकारी.