पुणे: जिथे निर्बंध शिथिल केले आहेत. तिथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडेवारी वरून लक्षात येत आहे. त्यामुळे अशा जिल्हा किंवा शहरात पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय आढावा घेऊन ठरवू. कारण कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या काही ठिकाणी वाढत असल्याची प्रशासनाकडून आकडेवारी येत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध कडक करायचे का, हे येत्या आठ दिवसांत ठरवू, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी असे संकेत पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले आहेत.
राज्यातील मुख्यतः अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. अशा जिल्ह्यातील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेत आहोत. त्यामुळे आणखी आठ दिवस आढावा घेण्यात येईल. त्यानंतर जिथे गरज आहे. फक्त त्याच जिल्ह्यांत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेऊ, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.