कोंढवा : शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे एरवी गर्दीने गजबजणारा खडी मशीन चौक रविवारी सुन्न होता. चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने येणाऱ्र्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत होती.
ट्रॅफिक पोलिसही शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची शहानिशा करत होते. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच शहरात प्रवेश देण्यात येत होता. कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पिसोली येथील पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारच्या वाहनांची गर्दी नव्हती. सर्व पेट्रोल पंपांवर शुकशुकाट होता. या भागातील सर्व किराणा मालाची दुकाने, मॉल, सुपर मार्केट सर्व बंद होती. केवळ आैषधालये आणि रुग्णालये खुली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला.
फोटो (कोंढवा)
फोटो ओळ
खडी मशीन चौक कोंढवा बुद्रुक येथील वर्दळ असलेल्या चौकात रविवारी शुकशुकाट होता.