टाकळी हाजी तालुका शिरूर व परिसरात कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शनिवार व रविवार दोन दिवस आरोग्य सेवा वगळता कडकडीत बंद राहणार आहे. आरोग्य केंद्राकडून तपासणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. तसेच घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी अंटेजीन तपासणी करत आहेत.
टाकळी हाजी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये एकूण 48 ऍक्टिव्ह रुग्ण असून पिंपरखेड 1, काठापूर खुर्द 0, फाकटे 2, वडनेर खुर्द 2, जांबुत 0, टाकळी हाजी 24 रावडेवाडी 0 म्हसे बुद्रुक 3 डोंगरगण 2 चांडोह 12 निमगाव दूडे 2 असे रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवार दिनांक 16 रोजी घरी जाऊन 141 लोकांची टेस्ट करण्यात आली पैकी 21 कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले,अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप बिक्कड यांनी दिली.
जे रुग्ण कोरोना बाधित आढलून आले आहेत. त्यांना तातडीने शासकीय मळगंगा कोविड सेंटर येथे दाखल करण्यात येत आहे. ग्रामपंचायत च्या वतीने आरोग्य सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवस्थापने बंद राहतील अशी दवंडी देण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्राम विकास अधिकारी राजेश खराडे यांनी केले आहे.