शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार

By admin | Published: October 15, 2014 5:21 AM

थेऊरजवळील कोलवडी येथे हवाईदलाचे विमान कोसळल्यावर संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला.

वाघोली/पिंपरी सांडस : थेऊरजवळील कोलवडी येथे हवाईदलाचे विमान कोसळल्यावर संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला.कोलवडी येथील साळुंके मळा परिसरामध्ये असणा-या सोपान व रमेश गायकवाड यांच्या उसाच्या शेतामध्ये एक सुखोई विमान आवाज करीत कोसळले. धुराचे लोट काही वेळाने अधिकच वाढू लागल्याने परिसरात असणा-या दहा ते बारा नागरीकांनी जवळच असणा-या विहीरीतून पाणी काढून पाण्याच्या सहाय्याने विमानाची आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. अपघातामध्ये उच्चदाबाची विद्युत तारही तुटली. यानंतर विमान कोसळल्याची घटना वा-यासारखी पसरली. घटनेची माहीती कळताच परिसरातील नागरिकांनी विमान पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. गायकवाड म्हणाले, ‘‘वाडेबोल्हाई येथून विमान पुण्याच्या देशेने जात असताना हवेमध्ये विमानातून मोठा आवाज व घरघर ऐकू येत होती. माझ्या घरापासून विमान ४०० मीटरच्या अंतरावर कोसळले. विमान पाचशे फुट घसरत जावून शेताच्या बांधाला अडकले व विमानाचा पुढचा भाग तुटून काही मीटरच्या अंतरावर जावून पडला. या घटनेमध्ये माझ्या घरच्यांसोबत मी भयभीत झालो होतो.विमानातून धुर येत असल्याचे आम्हाला समजल्यानंतर दहा ते बारा जणांनी मिळून पाण्याच्या सहाय्याने धुर विझविण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना माहीती दिली. शेतामध्ये विमान कोसळल्याने सुमारे अर्धा एकर उसाच्या पिकाचे व पाईपलाईने चे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बंधु सोपान गायकवाड, सुभाष गायकवाड, सुभाष उंद्रे यांच्या शेतीचेही नुकसान झाले आहे.