जेजुरी : पुरंदर तालुक्यातील निंबूत गावचे हद्दीत असलेल्या ज्युबिलंट लाईफ सायन्सेस केमिकल कंपनीमध्ये १७ एप्रिल रोजी विषारी वायु गळतीत ४८ कर्मचारी बाधित होवून मोठी दुर्घटना घडली होती. त्यातील एका कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला आहे. या कंपनी विरोधात शनिवारी (दि.११ मे) नीरा येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त बंद पाळला.सकाळपासूनच नीरेतील दवाखाने, सरकारी कार्यालये आदी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ आज कडकडीत बंद होती. व्यापारी, व्यावसायिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. ग्रामस्थांनी नीरा ग्रामपंचायतीसमोर एकत्र येवून कंपनी विरोधात घोषणाबाजी ही केली. ज्युबिलंट लाईफ सायन्सेस केमिकल कंपनी कंपनीतील रासायनिक प्लांटमध्ये विषारी वायु गळती झाली होती. यात कंपनीतील 48 कामगारांना विषबाधा झाली होती.
नीरा येथे ज्युबिलंट कंपनी बंद करण्यासाठी कडकडीत बंद : विषारी वायु गळती प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 6:40 PM
ज्युबिलंट लाईफ सायन्सेस केमिकल कंपनी कंपनीतील रासायनिक प्लांटमध्ये असिटिक अनहायड्राइडची विषारी वायु गळती झाली होती.
ठळक मुद्दे ४८ कर्मचारी बाधित होवून मोठी दुर्घटनासंजय ढवळे या अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू