पुणे: पश्चिम बंगालच्या काेलकात्यामधील आर. जी. कर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाच्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डाॅक्टर महिलेवर हल्ला, बलात्कार आणि हत्येच्या दु:खद घटनेबद्दल ‘बीजे’च्या निवासी डाॅक्टरांची संघटना ‘मार्ड’ने या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच, या प्रकरणाची चाैकशी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात यावी आणि डाॅक्टरांचे संरक्षणाबाबत शासनाने त्वरित पावले उचलावी, या मागणीसाठी आज संपावर गेले आहेत.
या संपादरम्यान तातडीच्या सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग, निवडक शस्त्रक्रियागृह सेवा, वॉर्ड ड्यूटी, लॅब सेवा आणि शैक्षणिक कर्तव्यदेखील थांबवण्याचा इशारा त्यांनी पत्रकातून दिला होता. सर्व आपत्कालीन सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे ‘मार्ड’ने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आज सकाळपासून ससून मधील निवासी डॉक्टर संपावर आहेत. काल मार्ड डॉक्टर ने पत्र दिलं आहे. आम्ही संपावर जात आहे. कलकत्ता मध्ये घटना घडायला नको होती ती घडली. रुग्ण सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे. सहाशे ते साडे सहाशे डॉक्टर संपावर जातं आहेत. निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन करत आहेत,फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तातडीच्या सेवा वेळी आम्ही येऊ अस मार्ड डॉक्टरांनी सांगितले आहे. - एकनाथ पवार,अधिष्ठता ,ससून रुग्णालय
‘मार्ड’च्या मागण्या
- केंद्रीय तपास यंत्रणेकडून काेलकात्याच्या गुन्ह्याचा तात्काळ निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा.- केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करावी.- आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या चांगल्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही आणि सुसज्ज रक्षक व्यवस्था असावी.- निवासी डॉक्टरांना दर्जेदार वसतिगृहे तसेच कॉल रूम्स उपलब्ध करून द्यावेत.- बीजे व सेंट्रल मार्डचा काेलकात्याच्या डाॅक्टरांच्या संपाला पाठिंबा