पुणे : रेल्वेच्या गु्रप ड मधील ट्रॅकमॅन, खलाशी, गँगमॅन, टेक्निशियन, स्वीपर या पदांसाठी आॅनलाइन परीक्षा घेतली जात आहे. पुण्यातील नºहे येथील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांमध्ये त्रुटी काढून १०० ते १५० विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न दिल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यातील काही विद्यार्थ्यांना तर अक्षरक्ष: धक्के मारून बाहेर काढल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
रेल्वे भरती बोर्डाकडून ग्रुप ड मधील ६४ हजार जागांसाठी देशभरात बुधवारपासून आॅनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर याठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. पुण्यात नºहे येथील एमसीबी बिझनेस सोल्युशन इंडिया प्रा. लि. या खासगी कंपनीमार्फत ही आॅनलाइन परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेला येताना कोणतेही छायाचित्र असलेले ओळखपत्र सोबत बाळगावे, अशी अट प्रवेशपत्रावर दिली आहे. त्यानुसार परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र आदी ओळखपत्रे सोबत आणली आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांची ओळखपत्रे डुप्लिकेट असल्याचे सांगून त्यांना परीक्षेला बसू देण्यास मज्जाव करण्यात आला. काही विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांच्या नावात असलेल्या स्पेलिंग मिस्टेकवरूनही त्यांना परीक्षेला बसू दिले नाही अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. परीक्षार्थी राहुल निकम, किरण मोकळ यांनी याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाकडे संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेली ओळखपत्रे डुप्लिकेट नसून ती अधिकृतच असल्याचे तिथल्या कर्मचाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.परीक्षेला बसू न दिल्यास त्यांची नोकरीची मोठी संधी हुकणार असल्याची त्यांनी विनवणीही केली. मात्र तिथल्या कर्मचाºयांनी अत्यंत वाईट वागणूक देऊन विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढले.विद्यार्थ्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार अर्ज दिला आहे. त्याचबरोबर पुण्याच्या रेल्वे विभागीय कार्यालयात तिथेही तक्रार केली आहे. त्यांना पुन्हा परीक्षेला बसू देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. पुण्यामध्ये इतर ३ केंद्रांवर तसेच दुसºया शहरांमध्ये रेल्वेच्या आॅनलाइन परीक्षा पार पडत आहेत. मात्र तिथे अशाप्रकारे ओळखपत्रातील त्रुटी काढण्यात येत नाही. तिथे एका ओळखपत्रावर किंवा ओळखपत्राच्या कलर छायांकित प्रतीवर परीक्षेला बसू दिले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.