गावातील सर्व रस्त्यांवर भाजीपाला विक्रेते, फळेविक्रेते, तसेच किराणा व शेती उपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने अतिक्रमण करून या गर्दीत भर टाकली आहे. सकाळी सात ते अकरा या वेळात या रस्त्यावरून दुचाकी,
चारचाकी, शेती उपयोगी वाहने यांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक अनेक ठिकाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. या गर्दीतून रुग्णवाहिकेलाही वाट काढणे अवघड होत आहे. मात्र, रस्त्यांवर अतिक्रमण करून जे फळविक्रेते, भाजीविक्रेते बसतात त्यांच्यावर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करण्याची मागणी उरुळी कांचन सजग नागरिक मंचाने केलेली आहे.
याबाबत उरुळी कांचनचे सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नागरिक व व्यावसायिक कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी अजिबात सहकार्य करीत नाहीत. यापुढील काळात पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन नियमबाह्य वर्तन करणाऱ्या नागरिक व व्यापाऱ्यांवर ग्रामपंचायत कडक कारवाई करणार आहे.
फोटो ओळ .. उरुळी कांचन येथील आश्रम रोडवर सकाळी नियमांचे उल्लंघन करीत असणारी गर्दी.