वडगाव निंबाळकर : शिरष्णे (ता. बारामती) येथे सोमवारी (दि. ९) आठच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांवरही संतप्त जमावाने दगडफेक केली. यामधे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सरकारी गाडीचे नुकसान झाले आहे. दोन गटांनी एकमेकांना केलेल्या मारहाणीत आठ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी ६० जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजी बिचकुले (वय ६८ ) यांच्या फिर्यादीवरुन अक्षय खलाटे, विशाल खलाटे, वैभव खलाटे, शंकर खलाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर खलाटे यांच्या रेशन दुकानबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून वरील चौघांनी मारहाण केल्याचे फियार्दीत म्हटले आहे. तर विरोधी शंकर गेनबा खलाटे (वय ५८) यांच्या फिर्यादीनुसार शिवाजी बिचकुले, आशा बिचकुले, धनंजय बिचकुले, भानुदास बिचकुले, गणपत बिचकुले, दत्तात्रय बिचकुले, कृष्णा बिचकुले, हनुमंत बिचकुले, संतोष बिचकुले, अंकुश पडार, दशरथ शिंदे, मंगल बिचकुले, छाया बिचकुले, रतन पडार, सोनाबाई बिचकुले, शैला बिचकुले, मनिषा बिचकुले, सरुबाई शिंदे, सारिका पडार, मनिषा बिचकुले, सरोबाई शिंदे, रामचंद्र पिंगळे, विलास पिंगळे, रामचंद्र खलाटे, प्रभाकर खुटवड, प्रदीप खलाटे, लक्ष्मण जानकर, बापुराव शिंदे, संतोष वाघमारे (सर्व रा. शिरष्णे ता बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेशन दुकानदार खलाटे कुटुंबाला मारहाण करण्यासाठी जमाव जमल्याची माहिती पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास बडवे घटनास्थळी पोहचले. जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतू खलाटे कुटुंबीयांना सुरक्षीत स्थळी पोलीस नेत असताना पोलीसांवर अंधारातून जमावाने दगडफेक सुरू केली. घटनेचे गांभिर्य ओळखुन उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह यांनी धाव घेऊन जमावाला पांगविले. जमाव पांगताच तेथे असलेल्या २४ दुचाकी पोलीसांनी ठाण्यामधे आणून लावल्या.
दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांवरही दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 3:27 AM