लाखेवाडी (ता. शिरूर) गावामधील हनुमान मंदिर सभामंडप भूमिपूजन झाले. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच शशिकला फुलसुंदर, उपसरपंच विनोद कदम, माजी सरपंच माधुरी थोरात, सदस्या राणी नरवडे, अनुसया कदम, दादा गावडे, रामचंद्र आनंदा गायकवाड, पोपट साळवे, किरण शिंदे, सोनाली दंडवते, सीमा कोळपे, सोनाली गायकवाड, महादेव मावळे, पाडुरंग जगताप, सुरेश मावळे, सुनील कोठावळे, माजी चेअरमन चंदरराव मावळे, सोपान पडवळ सपंत कोठावळे, उपाध्यक्ष सुजाता मावळे, दादाभाऊ कदम, बाळकृष्ण काचोळे, शशिकांत वाव्हळ, गणेश कदम, भगतसिंग दंडवते उपस्थित होते.
पोपटराव गावडे म्हणाले की, टाकळी हाजी कवठे येमाई जिल्हा परिषद गटाला मंत्री दिलीपराव वळसे पाटील व जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांच्या प्रयत्नांमधून गेल्या दहाच दिवसांत चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामधून रस्ते, शाळा, अंगणवाड्या , स्मशानभूमी सुधारणा तसेच म्हसे, रावडेवाडी, निमगाव दुडे येथे ग्रामपंचायत इमारतीचे कामे होणार आहेत .
मलठण गावाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे सरपंच उपसरपंच व सदस्य निवडून आणले असल्याने निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, फक्त पाठपुरावा करा असे आव्हान जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे यांनी केले. लाखेवाडी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच, सदस्यांचा सत्कार माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ सुभाष पोकळे, सरपंच शशिकला फुलसुंदर, मुंकुद नरवडे, दत्तोबा दंडवते, संदीप गायकवाड, योगेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले .
स्वागत विलास जगताप गुरुजी यांनी, तर मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप गुरुजी यांनी कविता सादर करीत सर्वाचे आभार मानले .
फोटो : लाखेवाडी, ता. शिरूर येथे भूमिपूजन करताना जि. प. सदस्या सुनीता गावडे , सरपंच शशिकला फुलसुंदर व मान्यवर.