पुणे : महामेट्रोचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले, अद्याप शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत सुरू झाले नाही. महामेट्रो आणि एसटी खात्यात समन्वय नाही. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजीनगर एसटी स्थानकाचा प्रवाशी मोठया प्रमाणात वापर करीत होते. प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत सुरू होण्यासाठी एसटी प्रशासनाने निर्णय घ्यावा. यासाठी स्वारगेट शंकरशेट रस्ता येथील एसटीच्या विभागीय कार्यालय येथे काँग्रेसच्या वतीने गुरूवारी दुपारी आंदोलन करण्यात आले.
शिवाजीनगर एसटी स्थानकाचा आराखडा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते असल्याने त्यांच्याकडे सादर केला होता. पण अद्याप निर्णय नाही. येत्या १५ दिवसात निर्णय होऊन एसटी स्थानक काम मूळ जागी सुरू व्हावे, असे निवेदनात म्हटले आहे. अन्यथा काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, संजय बालगुडे, चंद्रशेखर कपोते, नुरुद्दीन सोमजी, नरेंद्र व्यवहारे, प्रवीण करपे, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, शाबीर खान, भरत सुराणा, चेतन अग्रवाल, नितीन जैन, सुरेश कांबळे, अयुब पठाण, शंकर थोरवे, अविनाश अडसूळ, उमेश काची, स्वाती शिंदे, ॲड.रोहिणी शिंदे, अनिता माखवणा, अंजली सोलापुरे, मोना रायकर, मोहिनी मल्लव, दिलीप थोरात, लहू जावळेकर, नंदू बनसोडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.