खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांना खालुम्ब्रे (ता. खेड) येथून जात असलेल्या रिंगरोडला विरोध दर्शवण्यासाठी हरकत असल्याबाबत या संबंधित शेतकऱ्यांनी अर्ज दिला आहे.
या रिंगरोडमुळे खेड तालुक्यातील खालुम्ब्रे या गावात प्रामुख्याने बागायती जमिनी आहेत. अवघ्या कुटुंबाचे आयुष्य अवलंबून असलेली जमिनी व घरे रिंगरोडमध्ये जाणार असल्याने येथील शेतकरी चिंतेत असून रिंगरोडला तीव्र विरोध करणार आहेत. या शेतीप्रधान भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या रिंगरोडमध्ये जात असल्याने त्यांचेवर परागंदा होण्याची वेळ या शेतकऱ्यावर येणार आहे. येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. येथील शेतकऱ्यांचा या शेतजमिनीतून आपला उदरनिर्वाह होतो आहे. शेतजमीन जर रिंगरोडमध्ये गेल्यास आम्ही रस्त्यावर येणार आहोत तसेच अनेक शेतकरी भूमिहीन होतील त्यामुळे शासनाने या प्रस्तावित भागातून जाणाऱ्या रिंगरोडला स्थगिती द्यावी, अशी जोरदार मागणी येथील बाधीत शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रस्थापित रिंगरोडला बागाईत जमिनीचे भूसंपादन होत असल्याने या शेतकऱ्यांच्या काळजात त्यामुळे धस्स झाले आहे. प्रस्थापित रिंगरोडला विरोध दर्शवित या प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रस्थापित रिंगरोडसाठी बैठकीमध्ये शेतकरी, तहसीलदार वैशाली वाघमारे व अधिकारी उपस्थित होते.