पालकमंत्रिपद अजित पवारांकडे जाण्याची जोरदार चर्चा; पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 09:46 AM2023-08-11T09:46:17+5:302023-08-11T09:46:49+5:30

पालकमंत्र्यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ध्वजवदंन करण्यात येते, पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर

Strong talk of going to Ajit Pawar as guardian minister Chandrakant Patil will be the Guardian Minister of Pune | पालकमंत्रिपद अजित पवारांकडे जाण्याची जोरदार चर्चा; पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार

पालकमंत्रिपद अजित पवारांकडे जाण्याची जोरदार चर्चा; पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार

googlenewsNext

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार, याची गेल्या महिनाभरापासून जोरदार चर्चा होती. परंतु, सध्या तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार असल्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ध्वजवदंन करण्यात येते. स्वातंत्र्यदिनाचा ध्वजवंदन जिल्हा मुख्यालयात कोण करणार, याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण होणार आहे.

दिलीप वळसे पाटील - वाशिम, हसन मुश्रीफ -सोलापूर, धनंजय मुंडे - बीड, छगन भुजबळ - अमरावती, अनिल पाटील - बुलढाणा, आदिती तटकरे - पालघर, धर्मराव आत्राम - गडचिरोली, संजय बनसोडे - लातूर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे. शिवसेना व भाजपच्या मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी होती. ती आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे पालकमंत्री म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी ध्वजवंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Strong talk of going to Ajit Pawar as guardian minister Chandrakant Patil will be the Guardian Minister of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.