हडपसर : रामटेकडी येथील हडपसर औद्योगिक वसाहतीमधील पुणे महानगरपालिका १३ एकर जागेवर कचरा प्रकल्प सुरु करण्याचा घाट घालत आहे. त्या प्रकल्पाच्या विरोधात भाजपा वगळता सर्व पक्षीय व कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने आज मोर्चाकडून महापौर, महापालिका, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. या मोर्च्यात हजारो नागरिक नागरिक उपस्थित होते.यापूर्वी हडपसर मध्ये हंजर बायोटेक, दिशा वेस्ट मॅनेजमेन्ट, अजिंक्य, रोकेम, जनावरे जाळण्याचा कारकस प्रकल्प, कँटोन्मेंट कचरा प्रकल्प इ प्रकल्प हडपसर परिसरात असून गेली अनेक वर्षे हडपसरचे नागरिक हा कचरा सहन करावा लागत आहे.पुणे शहरात एकूण १६०० टन कचरा दररोज तयार होतो, त्यापैकी १०० टन कचरा हा वडगाव व बाणेर येथील कचरा प्रकल्पात जिरवला जातो व उर्वरित १५०० टन कचरा हा हडपसर परिसरात येतो आणि आणखी कचरा हडपसर परिसरात आल्यास त्यामुळे हडपसर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, महादेव बाबर, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, नगरसेवक योगेश ससाणे, प्रमोद भानगिरे, बंडू गायकवाड, नंदा लोणकर, अशोक कांबळे, आनंद अलकुंटे, विजय देशमुख, सुनील बनकर, वैभव माने यांच्या सह येथील हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
रामटेकडी प्रकल्पाविरोधात कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 2:44 PM
रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या विरोधात भाजपा वगळता सर्व पक्षीय व कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने आज मोर्चाकडून महापौर, महापालिका, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.
ठळक मुद्देहडपसर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणावर धोका पुणे शहरात एकूण १६०० टन कचरा दररोज तयार होतो, त्यापैकी १०० टन कचरा हा वडगाव व बाणेर येथील कचरा प्रकल्पात जिरवला जातो पालिका आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.