रोजचे प्रवासी-१ लाख २० हजार
चालकवाहकांची संख्या-२ हजारपेक्षा जास्त
रोज लाखभर प्रवासी
जिल्ह्यात १ लाख प्रवासी रोज एसटीने प्रवास करतात. त्याशिवाय बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगळी. इतक्या प्रवाशांचा स्थानकात किमान काही काळ तरी वावर असतोच. त्या वेळात त्यांच्याकडून कोरोना पासून बचावाची कसलीही काळजी घेतली जात नाही.
लसीकरण कधी
चालक, वाहक किंवा एसटीच्या स्थानकांमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप तरी झालेले नाही. वास्तविक सरकारी कार्यक्रमात वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही प्राधान्य देणे गरजेचे होते. तसे झालेले नाही.
मास्क-सॅनिटायझरचा खर्च
सुरुवातीच्या काळात आगार व्यवस्थापकांकडून चालक, वाहकांना साधे मास्क पुरवण्यात आले होते. नंतर त्यांनी स्वत:चे मास्क वापरणे अपेक्षित होते. कारण या इतक्या मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या मास्क व सॅनिटायझर बाटल्यांचा खर्च करायचा कोणी असा प्रश्न आहे.
तपासणीच नाही
चालक, वाहकांपैकी कोणी वैयक्तिक स्तरावर तपासणी करून घेतली असेन, मात्र प्रशासकीय स्तरावर समूह तपासणीचा असा एकही कार्यक्रम घेतलेला नाही.
कोट
जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही चालक, वाहकांचे लसीकरण प्राधान्याने करावे, अशी मागणी करणार आहोत. सुरूवातीच्या काळात त्यांना मास्क दिले होते. गाड्याही स्थानकात येण्यापूर्वी संपूर्ण सॅनिटाईज करून घ्याव्यात अशा सूचना आहेत. स्थानकात प्रवासी किंवा चालकवाहक यांची संख्या मोठी असल्याने त्यांनी स्वत:च काळजी घेणे अपेक्षित आहे.
- रमाकांत गायकवाड, आगारप्रमुख, पुणे जिल्हा विभाग नियंत्रक