पुणे : शहरातील भिकाऱ्यांची वाढती संख्या महापालिका प्रशासनाची चांगली डोकेदुखी ठरत आहे. या भिकाऱ्यांनी बहुतेक ठिकाणी थेट फुटपाथवरच संसार थाटले आहेत. यामुळे पदपथावरच जाहिरातीचे बॅनर्रस् व अन्य वस्तूंच्या साह्याने चुलीपुरता आडोसा करून स्वयंपाक करणे, पदपथावरच अंघोळ करणे आणि त्याच परिसरामध्ये उघड्यावरच शौचालयास जातात. या भिकाऱ्यांनी फुटपाथवर प्रचंड अस्वच्छता केली आहे. नागरिकांनादेखील यामुळे त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. सध्या शहरामध्ये केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु आहे. या अंतर्गत केंद्राचे पथक येऊन शहराच्या स्वच्छतेची पाहणी करते. यामध्ये भिकाऱ्यांनी पदपथावर केलेली घाण, उघड्यावर केलेल्या शौचालयाचा परिणाम स्वच्छतेच्या रॅकिंगवर होणार आहे. पालिकेकडून लवकरच पुन्हा एखा दा भिकारीमुक्त शहर मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. ......शहरात दिवाळीनंतर, मोठ्या प्रमाणात भिकाºयांची संख्या वाढली आहे. पूर्वी केवळ बाजारपेठांचे रस्ते व मध्यवस्तीमध्ये मर्यादित असलेल्या या भिकाºयांनी आता आपला मोर्चा शहराच्या उपनगरांकडे वळविला आहे. पुणे : शहरामध्ये गेल्या काही दिवसांत भिकाºयांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये जगोजागी या भिकाºयांनी थेट फुटपाथवरच संसार थाटले आहेत. पदपथावरच चूल करून स्वायंपाक, अंघोळ आणि उघड्यावर शौचालय करत असल्याने या भिकाºयांनी शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला मोठा खोडा घातला आहे. या भिकाºयांवर कारवाई केल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा वेगळ्या ठिकाणी राहण्यास सुरुवात करतात. यामुळे प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी झाली आहे.ॉ.......सिंहगडरोड, कोथरुड, वारजे, हडपसर, कॅम्प, वडगवा शेरी, कात्रज सारख्या परिसरामध्ये मुख्य रस्ते व चौकांमध्ये पदपथांवरच पाच-सहा किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या भिकाºयांच्या कुटुंबांनी थेट पदपथावरच संसार थाटले आहेत.........यामध्ये बहुतेक भिकारी परप्रांतीय व हिंदी भाषिक असल्याचे लक्षात येते. या भिकाºयांकडून फुगे, बंदी असलेल्या गारबेज बॅग, विविध लहान-मोठ्या चायनिज वस्तूची विक्री करुन नागरिकांकडून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.......भिकारीमुक्त शहरासाठी कायदेशीर कारवाई करणारशहरामध्ये भिकाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिका आणि पोलिसांच्या वतीने भिकारीमुक्त शहरासाठी वारंवार प्रयत्न करण्यात येतात. आतापर्यंत हजारो भिकाºयांना महापालिकेच्या रात्रनिवारा (नाईट शेल्टर) प्रकल्पामध्ये पुनर्वसन करण्यात आले. परंतु, नाईट शेल्टरमध्ये सोडलेल्यानंतर काही दिवसांत पुन्हा रस्त्यावर येतात. यामुळे आता भिकारीमुक्त शहरासाठी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. - माधव जगताप, अतिक्रमण विभागप्रमुख
पुणे शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियाना’ला खोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:24 PM
भिकाऱ्यांची संख्या वाढली : पदपथावरच थाटले संसार; प्रशासनाची बनली डोकेदुखी
ठळक मुद्देसध्या शहरामध्ये केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरुभिकाऱ्यांनी पदपथावर केलेली घाण, उघड्यावर केलेल्या शौचालयाचा परिणाम रॅकिंगवर होणार