पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी राहिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि मराठी शाळांना मोठा हातभार लागेल, असे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिंतामणी ज्ञानपीठच्या संयुक्त विद्यमाने कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये. यासाठी एक हजार विद्यार्थ्यांची वार्षिक फी थेट त्यांच्या शाळेत भरण्यात आली. या उपक्रमाचा प्रारंभ अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
नवीन सर्किट हाऊस येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास माजी महापौर दत्ता धनकवडे, अंकुश काकडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, उपक्रमाचे संयोजक शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष अप्पा रेणुसे, नगरसेवक युवराज बेलदरे, महेंद्र पठारे, माजी नगरसेवक संतोष फरांदे, स्वीकृत सदस्य युवराज रेणुसे , धनकवडी येथील बालाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नायडू, वामनराव विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर बोरसे आदी उपस्थित होते.
अप्पा रेणुसे यांनी कोरोना मुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली असल्यामुळे २९ मराठी माध्यमाच्या शाळातील एक हजार विदयार्थी व विदयार्थ्यांनींची फी भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
--------
फोटो मेल केला आहे.