सोमेश्वरनगर : सजावट केलेल्या बैलगाडीतून शाळेमध्ये ढोल-ताशांच्या गजरात ऊसतोड कामगार मुलांचा शालेय साहित्य देऊन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते सोमेश्वर कारखाना तळावरील ९४ मुलांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोमेश्वर विद्यालय येथे आज पार पडला. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट मुंबई आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अशा प्रकल्पाच्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या तालुक्यांतील केलेल्या सर्वेक्षणात ६ ते १४ वयांची ६०९ मुले आढळली आहेत. यातील सोमेश्वर कारखाना तळावरील ९४ मुलांना जिल्हा परिषद, सोमेश्वर आणि सोमेश्वर विद्यालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. दरम्यान ‘आशा’ या इंग्रजी भाषेचे आणि ‘शिक्षणकोंडी’ या मराठी भाषेच्या अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी विद्या परिषदेच्या उपसंचालिका शोभा खंदारे, शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणधिकारी राजेश क्षीरसागर, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक लक्ष्मण गोफणे, डायटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, डायट प्राचार्या कमलादेवी आवटे, गटशिक्षणधिकारी संजय जाधव, गटशिक्षणधिकारी गजानन आडे, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे उपस्थित होते. प्रकल्पप्रमुख संतोष शेंडकर यांनी सूत्रसंचालन, तर प्रास्ताविक परेश ज. म यांनी केले. .....राज्यात दोनशे साखर कारखाने आहेत. पंधरा जिल्ह्यांतून जवळपास दहा लाख कामगारांचे स्थलांतर होते असते. यांच्यासोबत एक लाख शाळांतील मुले स्थलांतरित होत असतात. यांचे शिक्षण, तसेच आरोग्य, सुरक्षा हे पण प्रश्न आहेत. हे स्थलांतर कसे रोखता येईल आणि सहा महिने सुविधा कशा मिळतील? यासाठी काम करणार असून, पुढील काळात स्थलांतर होणार नाही यासाठी उपाययोजना करू.- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र ......
ढोल-ताशांच्या गजरात ऊसतोड कामगार विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 3:21 PM
राज्यात दोनशे साखर कारखाने; पंधरा जिल्ह्यांतून जवळपास दहा लाख कामगारांचे स्थलांतर..
ठळक मुद्देऊसतोडणी मजुरांच्या मुलांचे वाजत-गाजत स्वागतबारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या तालुक्यांतील सर्वेक्षणात ६ ते १४ वयांची ६०९ मुले ९४ मुले जिल्हा परिषद, सोमेश्वर आणि सोमेश्वर विद्यालय या ठिकाणी दाखल