पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला इयत्ता आठवीपर्यंत नापास करता येत नाही. मात्र, हचिंग शाळेने इयत्ता ५ वीमधील विद्यार्थ्याला नापास केल्याची तक्रार त्याच्या पालकांनी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोमवारी (दि. २जुलै ) केली. तावडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत येत्या ८ दिवसांमध्ये या शाळेविरूध्द कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.बालभारतीच्यावतीने विनोद तावडे यांच्याहस्ते दिक्षा अॅपच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तावडे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधला. यावेळी पालक शैलेश शिंदे यांनी त्यांच्या मुलाला हचिंग शाळेने इयत्ता आठवीमध्ये नापास केले असल्याची कैफियत मांडली. यावेळी तावडे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती द्या, चौकशी करून येत्या ८ दिवसात त्या शाळेविरूध्द कारवाई करतो असे सांगितले.शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला ८ वीपर्यंत नापास करता येत नाही, तरीही शाळेने शिंदे यांच्या मुलाला घरी बसविले. त्यामुळे त्याचे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसान झाले आहे. तो चांगला फुटबॉलपटू आहे. पण शाळेने जाणीवपूर्वक त्याला नापास करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर तावडे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून त्या शाळेविरूध्द कारवाई करण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या...........अल्पसंख्याक असल्याने कायदा लागू होत नसल्याचा दावाहचिंग शाळा ही अल्पसंख्याक असल्याने या शाळेला शिक्षण हक्क कायदा लागू होत नाही. त्यामुळे शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येऊ शकते असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, अल्पसंख्यांक शाळांनाही शिक्षण हक्क कायदा लागू होतो असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. अनेक शाळा अल्पसंख्यांक असल्याचे सांगून आरटीई अंतर्गत प्रवेश न देणे, आरक्षण न पाळणे अशा बेकायदेशीर कृत्ये करत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
हंचिंग शाळेने विद्यार्थ्याला केले पाचवीत नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 8:36 PM
शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला ८ वीपर्यंत नापास करता येत नाही, तरीही शाळेने विद्यार्थ्याला घरी बसविले.
ठळक मुद्देशिक्षणमंत्र्यांकडे तक्रार : ८ दिवसांमध्ये कारवाई करणारअल्पसंख्याक असल्याने कायदा लागू होत नसल्याचा दावा