पुणे : सध्या देशात बेराेजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. राेजगाराच्या पुरेश्या संधी उपलब्ध नसल्यामुळे उच्चशिक्षित तरुण बेकार असलेले पाहायला मिळत अाहे. पुण्यातील अविराज पॅम्पलेट बाईजची कहाणीच मात्र निराळी अाहे. नळस्टाॅप चाैकात राेज सकाळी हे पॅम्पलेट बाॅईज वृत्तपत्रांमध्ये जाहीरातींचे पॅम्पलेट टाकण्याचे काम करतात. अापण अाईवडीलांकडे पाॅकेटमनी मागायचा नाही, तर अापला पाॅकेटमनी अापणच मिळवायचा या उद्देशाने हे तरुण पहाटे 3 वाजता उठून वृत्तपत्रांमध्ये पॅम्पलेट टाकण्याचे काम करतात. या तरुणांची घरची परिस्थीती तशी चांगली अाहे. हे तरुण विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत अाहेत, तर काहीजन विविध ठिकाणी नाेकरी करत अाहेत. शिक्षण घेत असताना इतर खर्च भागविण्यासाठी अापल्या अाई-वडिलांकडे पैसे मागण्यापेक्षा स्वतः पैसे कमवायचे या विचाराने हे तरुण काम करतात. या तरुणांना हे काम करताना कुठलिही लाज वाटत नाही. तर अापण आपल्या खर्चासाठी अाई-वडिलांवर अवलंबून नाही याचा त्यांना अभिमान वाटताे. राेज पहाटे उठून ते नळस्टाॅप चाैकात येतात. जाहीरातदाराच्या अपेक्षेप्रमाणे पॅम्पलेट भरभर वृत्तपत्रांमध्ये भरतात. दाेन ते तीन तासात अापले काम अाटाेपून अापल्या दिवसभराच्या इतर कामांसाठी जातात. साधारण तिनशे ते चारशे रुपये त्यांना राेज मिळतात. 22 तरुणांचा हा ग्रुप असून राेज न चुकता अापले काम उत्साहाने करतात. ज्यांच्या घरची परिस्थिती बेताची अाहे त्या तरुणांना पहाटेच्या या दाेन तासाच्या कामाने थाेडा का हाेईना हातभार लागत अाहे. या मुलांना अविराज चव्हाण या तरुणाने एकत्र अाणले अाहे अाणि त्यांना काम दिले अाहे. अविराज म्हणाला, माझी सुरुवातही याच कामातून झाली. मला त्यावेळी कळालेलं पैशांचं मह्त्व मी तरुणांना सांगताे. अाज अनेक महाविद्यालयीन तरुण अापल्या पाॅकेटमनीसाठी हे काम करतात. अाज सगळीकडे काम नाही, नाेकऱ्या नाही अशी अाेरड पाहायला मिळते. परंतु ज्याची काम करण्याची इच्छा अाहे, त्याला काम हे मिळतेच. अाज माझ्यासाेबत अनेक मुलं काम करतात. सकाळी पहाटे उठून काम करावं लागत असल्याने यात कष्ट खूप अाहेत. पण कष्टाशिवाय या जगात पर्याय नाही.
पाॅकेटमनीसाठी ते उठतात पहाटे 3 वाजता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 6:02 PM