पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील (स.प) अाेपन कॅन्टीनजवळ टाकण्यात अालेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थी चांगलेच हैराण झाले अाहेत. या कचऱ्यात माेठ्याप्रमाणावर झाडांच्या फांद्या, पालापाचाेळा अाहे. पावसामुळे हा कचरा भिजल्याने ताे कुजून या ठिकाणी डासांची उत्पत्ती झाली अाहे. त्यामुळे जेवणासाठी अाेपन कॅन्टीनमध्ये अालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच येथे जवळच नाटकाची तालीम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अाराेग्य धाेक्यात अाले अाहे.
स.प. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या बाजूला अाेपन कॅन्टीन सुरु करण्यात अाले अाहे. याठिकाणी विद्यार्थी डबा खाण्यासाठी तसेच गप्पा मारण्यासाठी येत असतात. या अाेपन कॅन्टीनच्या मागेच हा सर्व कचरा असल्याने जेवताना विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत अाहे. तसेच या ठिकाणी डासही माेठ्याप्रमाणावर झाल्याने डास चावल्याने एखादा अाजार हाेण्याची शक्यता अाहे. जवळच नाटकाची तालीम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हाॅल अाहे. या ठिकाणी विद्यार्थी नाटकाची तालीम करत असतात. या कचऱ्याच्या दुर्गंधामुळे तसेच डासांच्या त्रासामुळे त्यांना अगरबत्ती लावून तालीम करावी लागत अाहे. महाविद्यालयातील एक विद्यार्थी म्हणाला, या ठिकाणी माेठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला अाहे. झाडांच्या फांद्या, पालापाचाेळा तसेच इतर कचऱ्यामुळे येथून दुर्गंधी येत अाहे. त्याचबराेबर हा कचरा कुजल्यामुळे डासांचा त्रासही वाढला अाहे. महाविद्यालयाचे कर्मचारी सुद्धा येथेच कचरा टाकत असल्याने या कचऱ्यात वाढ हाेत अाहे. त्यामुळे लवकरात लवकर या कचऱ्याची विल्वेवाट लावणे अावश्यक अाहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ म्हणाले, पुढील एक ते दाेन दिवसात हा कचरा हलविण्यात येणार अाहे. महाविद्यालयात माेठ्याप्रमाणावर झाडी असल्याने त्यापासून निर्माण हाणाऱ्या कचऱ्यापासून गांडूळखत तयार करण्यात येते. सध्या हे खत तयार करण्याची प्राेसेस ही 3 महिन्यांची अाहे, ती कमी करण्याचा अाम्ही प्रयत्न करत अाहाेत. त्यामुळे लवकरच हा सर्व कचरा तेथून हटविण्यात येणार अाहे. त्याचबराेबर महाविद्यालयात निर्माण हाेणारा कचरा हा महाविद्यालयातच जिरविण्यात येणार असल्याने येत्या काळात कचऱ्याची समस्या राहणार नाही.