आपल्या भारताची संस्कृती उज्ज्वल असताना देखील आजची पिढी पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करताना दिसते. या वयात विद्यार्थ्यांमध्ये योग्य ते संस्कार झाले पाहिजे म्हणून चाणक्य कनिष्ठ महाविद्यालयात व्हलेनटाईन डे ऐवजी मातृदिन साजरा करण्यास सुरुवात आल्याची माहिती संस्थापक प्रा. बढे यांनी दिली.
यावेळी मातृतुल्य व्यक्ती म्हणून पौड पंचायत समितीच्या माजी सभापती सविताताई पवळे व ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा शाळीग्राम यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुळशी तालुका सहकार्यवाहक अद्वैत जगधने हे उपस्थित होते.
प्राध्यापक साजिद इनामदार व सर्व शिक्षक वृंद यांनी संस्थेच्या अध्यक्षा अयोध्या बडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रास्ताविक माधुरी पल्हारे यांनी केले. ११ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी आदित्य शिंदे व उद्धव राऊत यांनी सूत्रसंचालन केले. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींनी प्राध्यापिका नीलम वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली गीत सादर करण्यात आले. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी आदिती सरदेसाई व साक्षी कुदळे यांनी प्राध्यापिका पवन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली मातृदिन या विषयावर भाषण सादर केले. विशेष अतिथी प्रा. प्रतिभा शाळिग्राम व प्रा. जगदाने यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. मातृदिनाचे औचित्याने प्रमुख अतिथी सविताताई पवळे व प्राध्यापिका प्रतिभा शाळिग्राम यांचे औक्षण प्रा. साजिद इनामदार यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींचे औक्षण करण्यात आले. यावेळी प्रशांत कोळी, सायली ढमाले व गणेश फंटागरे आदिंनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी
फोटो : पौड पंचायत समितीच्या माजी सभापती सविता पवळे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करताना संस्थेच्या अध्यक्षा अयोध्या बढे.