पुणे :विद्यार्थ्यांना दीर्घकाळ शिक्षणाला जोडून ठेवायचं असेल तर त्यांच्यातलं कुतूहल हे जागं ठेवल पाहिजे. गणित आणि भाषा हे दोन विषय असे आहेत की, या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची गोडी लागायला हवी. मग ही गोडी लावण्यासाठी त्यांना हसत खेळत शिक्षण कसं देता येईल या जाणीवेतून एक प्रकल्प आकाराला आला आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे, ‘दोस्ती गणित आणि भाषेशी’!. या विषयांशी विद्याथर््यांची ख-या अर्थाने ’दोस्ती’होण्यासाठी ‘मंथन’ या संस्थेतर्फे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्याथर््यांसाठी हा प्रकल्प राबविला जात आहे.
सद्यस्थितीत विद्यार्थी ऑनलाइनद्वारे शैक्षणिक धडे गिरवत आहेत. पण या अभ्यासाबरोबरच मुलांना आवडेल व त्यातून त्यांची मुलभूत कौशल्ये वाढतील या दृष्टीकोनातून मंथन या संस्थेने मुलांना व्हॉटसअपवर गोष्टी आणि कोडी पाठवायला सुरूवात केली. ’गणित’ हा खरंतर ब-याच मुलांच्या नावडीचा विषय. पण तो कोडं म्हणून विद्याथर््यांसमोर आला. अगदी कागदाच्या घड्याचं कोडं, काड्यांच बुद्धधीबळ ,शब्दकोडी अशी अनेक कोडी किंवा खेळात विद्यार्थी रमले. गेल्या पाच महिन्यात या प्रकल्पाशी वीस शाळांमधील जवळपास 4 हजार मुले जोडली गेली असून, इंग्रजी आणि मराठी अशा दोन माध्यमातून हा प्रकल्प सुरू असल्याची माहिती ‘मंथन’ संस्थेचे राहुल कोकीळ यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोकीळ म्हणाले, शालेय शिक्षणात भाषा शिकताना ‘ऐकणे’ म्हणजे श्रवण यासारख्या दुर्लक्षित बाबींवर भर दिल्यामुळे अनेकांनी गोष्टी ऐकायला सुरूवात केली. शब्दसंग्रह वाढीसाठी हीच खरतंर पहिली पायरी आहे. यासाठी गोष्टीचा वेगळा विचार करावा लागला. प्राथमिक वयोगटातल्या विद्याथर््यांसाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. पण माध्यमिक वयोगटातल्या मुलांसाठी गूढकथा, साह्सकथा, शोधांच्या कथा अशा कथांची मांडणी करण्यात आली. अंटार्टिका शोधाची गोष्ट, लुई पाश्चरची कथा, उत्खननाची गोष्ट अशा अनेक कथा आगामी काळात येणार आहेत.
--------------------------------------------