शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

HSC & SSC Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By प्रशांत बिडवे | Published: November 01, 2023 6:40 PM

बारावीच्या परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १ ते २६ मार्च कालावधीत हाेणार

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीच्या परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १ ते २६ मार्च कालावधीत हाेणार आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर दि. २ नाेव्हेंबर राेजी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. १० ते २९ फेब्रुवारी तर इयत्ता बारावीची परीक्षा दि. २ ते २० फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahasscboard.in या संकेतस्थळावर गुरूवार दि. २ नाेव्हेंबर पासून वेळापत्रक पाहता येणार आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात परिक्षेचे वेळापत्रक देण्यात येणार असून ते अंतिम असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

समाजमाध्यमावरील वेळापत्रक ग्राह्य धरू नका

छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला यावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

दहावी-बारावी लेखी परीक्षांचे वेळापत्रक

इयत्ता बारावी सर्वसाधारण, व्यवसाय व द्विलक्षी अभ्यासक्रम - दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्चमाहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा (इ. बारावी) - दि. २० मार्च ते २३ मार्चइयत्ता दहावी - दि. १ मार्च ते २६ मार्च

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीHSC / 12th Exam12वी परीक्षाssc examदहावी