शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

राज्य शासनाने सर्व पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीद्वारे करावी यासाठी विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आलेल्या ऑनलाईन मोहिमेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नाही, मोहीम अजुन काही दिवस चालू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 7:26 PM

दहा ते चौदा मार्च दरम्यान राबवण्यात आली होती मोहीम

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांचे लक्ष गुंतले आंदोलनात

आरोग्य विभागाच्या पद भरतीमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीद्वारे करावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून "आता नाही तर कधी नाही'' ही ऑनलाईन  हॅशस्टॅग मोहीम १० ते १४ मार्च दरम्यान सुरू केली होती. पण विद्यार्थ्यांचा मोहिमेला भरगोस प्रतिसाद नसल्याने ती अजून काही दिवस चालू राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. 

या ऑनलाइन मोहिमेत येत्या १४ तारखेपर्यंत सत्ताधारी व विरोधी परीक्षातील नेत्यांना एमपीएससीतर्फे सर्व पदांची भरती करावी , अशी मागणी आॅनलाइन साधनांच्या माध्यमातून केली जाणार होती.  राज्य शासनाने यापूर्वी विविध पदांची भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतली. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेसह अनेक विद्यार्थी संघटनांनी महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेऊ नयेत,अशी मागणी केली. सर्वच क्षेत्रातून याबाबत मागणी होत असल्याने अखेर महापरीक्षा पोर्टलद्वारे या पुढे परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. परंतु,पुन्हा दुस-या खासगी कंपन्यांकडे परीक्षेची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे सर्व परीक्षा केवळ एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात,अशी मागणी पुन्हा एकदा समोर आली.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री जयंत पाटील,बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे , आदित्य ठाकरे, नाना पटोले, रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ई-मेल व ट्विटरद्वारे एसएमएस पाठवावेत,असे आव्हान स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी केली आहे.

एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बढे म्हणाले, ऑनलाइन मोहिमेबरोबरच राज्यभरात आंदोलन चालू झाले होते. अशा वेळी विद्यार्थ्यांचे लक्ष आंदोलनात गुंतले होते. त्यामुळे मोहिमेला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच अजून काही दिवस ऑनलाइन मोहीम चालू ठेवली आहे. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीMPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्र