रांजणगाव गणपती - आपल्या भारत देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर अहोरात्र खडा पहारा देणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने राख्या बनविल्या असून, शुभेच्छा संदेश कार्डेही बनविली आहेत.या सर्व राख्या व कार्डे सीमेवरील जवानांना येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी पोहोचविण्यासाठी पुणेसैनिक बोर्डाचे प्रतिनिधी माजीसैनिक नवले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिरचे विद्यार्थी दर वर्षी रक्षाबंधनाला भारतीय सीमेवरील जवानांना राख्या पाठवितात. या वर्षी विद्यार्थ्यांनी या राख्या विद्यालयाचे प्राचार्य दिलीप पवार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. संजीव मांढरे, आशा लोखंडे, प्रकाश धोत्रे, महेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत साहित्य आणून स्वत: बनविल्या. वीर जवानांना पाठविण्यासाठी शुभेच्छा संदेश कार्डेही बनविली आहेत, असे दिलीप पवार यांनी सांगितले.
सैनिकांसाठी विद्यार्थ्यांनी बनविल्या राख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 1:05 AM