लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दहावीच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेला विरोध करण्यासाठी एका दहावीच्या विद्यार्थ्यानेच थेट उच्च न्यायालयात धाव घेऊन हस्तक्षेप याचिका दाखल केली. परंतु न्या. आर. डी. धनुका व न्या. माधव जामदार यांनी त्याची याचिका अस्वीकृत केली. रिशान सरोदे असे या मुलाचे नाव आहे.
साथीच्या आजाराच्या यापार्श्वभूमीवर दहावीतील विद्यार्थी जवळपास 13 ते 14 महिने अभ्यास करीत होते. परीक्षा द्यायची नाहीच असा विचार करून विद्यार्थी सततच्या तणावग्रस्त परिस्थितीत अभ्यास करीत, विविध नवीन प्रक्रियांमधून जात होते असे म्हणणे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरेल. पण आता एकदा रद्द केलेली परीक्षा पुन्हा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव टाकणे ठरेल. न्यायालयाने बालकांच्या हक्कांचा विचार करावा, अशीही विनंती रिशानने केली होती. मात्र, त्याची हस्तक्षेप याचिका सध्या सुरू असलेल्या धनंजय कुलकर्णी यांच्या याचिकेत समाविष्ट करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
-----------------------------------