विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी लक्षणीय आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विज्ञान शाखेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येचा विचार करता वाणिज्य व कला शाखेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. बारावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, बीसीएस, बीसीए आदी अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. त्यानंतर बेसिक सायन्स अभ्यासक्रमाचा विचार करत आहेत.
--------------
मूलभूत विज्ञानविषयक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. बारावीनंतरच्या विज्ञान शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. कुठेच प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थी विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यामुळे अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटी विज्ञान शाखेच्या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते.
- डॉ. एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----------------
इन्कम टॅक्स, जीएसटीसह इतर घटकांचा समावेश वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. सीए, सीएस संदर्भातील काही तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते. तसेच त्यासाठी इंटर्नशीपही उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थी वाणिज्य अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन सीए, सीएस परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे वाणिज्य शाखेत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----------------
अकरावी प्रवेशाच्या कटऑफमध्ये घट झाली असली तरी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या कटऑफमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांकडून प्रथम प्राधान्य वाणिज्य शाखेस दिले जात आहे. त्यानंतर कला व विज्ञान शाखेस विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
------------------------
केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागात सुध्दा विद्यार्थ्यांकडून वाणिज्य अभ्यासक्रमास सर्वाधिक पसंती दिली जात आहे. त्यानंतर कला व शेवटी विज्ञान शाखेस विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.
- संजय चाकणे, प्राचार्य, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूर