लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : विद्यार्थ्याने कितीही मार्क मिळविले तरी भविष्यात मोठी स्पर्धा असून विद्यार्थ्यांना तिला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे मुल्यमापन करून महाविद्यालयात प्रवेश घेताना आपले आवडीचे क्षेत्र निवडावे असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रस व आंबगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने मंचर येथे सन्मान गुणवंताचा २०१७ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वळसे पाटील बोालत होते, ते पुढे म्हणाले आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थी विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो यासंदर्भात बोलताना ते म्हणाले पास होण्याचे प्रमाण वाढल्याने अकरावीसाठी अनेकांना प्रवेश घेताना धडपड करावी लागत आहे. अस्सलित इंग्रजी बोलता आले पाहीजे. इंग्रजी येत नसेल तर ना उमेद न होता प्रयत्न करत राहा. नालंदा शाळेत विद्यार्थ्यासाठी प्रवेश परीक्षा पुर्वतयारीसाठी अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी पांडुरंग गायकवाड, इंद्रजीत जाधव, उत्तम अवारी, तनुजा आदक, वैष्णवी थिगळे, स्नेहल जाधव, शास्त्रज्ञ अमित झोडगे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर कानडे , देवदत्त निकम, अरूणा थोरात, नंदाराम सोनावले, रवींद्र सबनीस, सुषमा शिंदे , प्रशांत अभंग , नीलेश शेळके, आदेश गाडे, नीलेश थोरात आदी उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील अॅपचे लाँचिंग यावेळी करण्यात आले. प्राचार्य सुनील वळसे यांनी प्रास्ताविक केले.
विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडावे : वळसे पाटील
By admin | Published: July 17, 2017 3:55 AM