शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, मराठीतून अभ्यासक्रमाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:31 AM

फर्ग्युसन महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून हद्दपार करण्याच्या हेतूने बीएच्या विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचा आरोप करून बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन केले.

पुणे - फर्ग्युसन महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून हद्दपार करण्याच्या हेतूने बीएच्या विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचा आरोप करून बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच, मराठीतून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी लावून धरली.फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमांमधून पॉलिटिकल सायन्स, अर्थशास्त्र, इतिहास, मराठी, मानसशास्त्र विषायांत अभ्यासक्रम पूर्ण करता येत होता. परंतु, महाविद्यालय प्रशासनाने इतिहास आणि समाजशास्त्र विषयांसाठी मराठीतून अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही, असे अचानक जाहीर केले. त्यामुळे दुसºया वर्षासाठी मराठीतून अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाºया ५० ते ६० विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या खोलीबाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला जनता दल युनायटेडचे सरचिटणीस कुलदीप आंबेकर यांनी पाठिंबा दिला होता. याबाबत कौस्तुभ पाटील हा विद्यार्थी म्हणाला, ‘‘महाविद्यालयाने दुसºया वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू असताना अचानक इतिहास व समाजशास्त्र विषयांच्या अभ्यासक्रमांना मराठीतून प्रवेश घेता येणार नाही, असे जाहीर केले. तसेच, महाविद्यालयाला हे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून घेण्यासाठी परवानगी नसल्याचे सांगितले. परंतु, इतकी वर्षे हा अभ्यासक्रम मराठीतून होत असताना यंदाच्या वर्षी अचानक का बंद करण्यात येत आहे? प्रशासनाने कुठलेही उत्तर दिले नाही. मराठी माध्यमात शिकणारी मुले हे गावाकडील, गरीब घरातील विद्यार्थी आहेत. त्यांना अचानक इंग्रजीमधून अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य नाही. मराठीतील अभ्यासक्रम बंद करून सर्व अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये करायचे आहेत. असे झाल्यास गरीब विद्यार्थ्यांना फर्ग्युसनमधून शिक्षण घेता येणार नाही.’’विद्यार्थी प्रतिनिधी संध्या सोनवणे म्हणाली, ‘‘या विषयांबाबत प्राचार्य व उपप्राचार्य यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून संवाद साधण्यात येत होता. प्रशासनाकडून आधीपासूनच या अभ्यासक्रमांना मान्यता नसल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या वर्षापासून मराठीतून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नसल्याचे महाविद्यालयाने जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.’’बीएच्या विद्यार्थ्यांना इतिहास आणि समाजशास्त्र या विषयांत मराठी माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याला यापूर्वी परवानगी देण्यात येत होती. मात्र, यंदापासून शिक्षण विभागाच्या नियमांनुसार हे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून करता येणार नसल्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास त्यांना मराठी माध्यमातून इतिहास आणि समाजशास्त्र विषय घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी मिळण्याबाबत प्रयत्न करू.- डॉ. आर. जी. परदेशीप्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या