पुणे :लोणी स्टेशन येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजलेलं नसून पोलिस तपास करीत आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतीगृह वार्डन सुजाता स्वामी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, येथे शिक्षण घेणारी वीस वर्षीय विद्यार्थिनीने अज्ञात कारणासाठी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या शिक्षण संस्थेत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची हजेरी घेत असताना वसतीगृह वार्डन सुजाता स्वामी यांना काही मुली अनुपस्थित असल्याचे लक्षात आले. यावर त्यांनी एक शिपाई अशा विद्यार्थिनींना बोलावण्यास पाठविले.परंतु एका खोलीतील विद्यार्थिनी दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी स्वामी यांना सांगितले.यावर सुरक्षा रक्षक अधिकारी यांना याची कल्पना दिली त्यावर दरवाजा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.दोन सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडला असता ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती .यावर ताबडतोब लोणी काळभोर पोलिसांना खबर दिली.पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचार्यांना पाठवले व त्या विद्यार्थिनीला विश्वराज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.परंतु हॉस्पिटल प्रसाशनानेती मृत असल्याचे घोषित केले. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस चे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
लोणी स्टेशन येथे विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 7:54 PM