शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

विद्यार्थ्यांना मिळणार अंतराळातील सॅटेलाइट, रोबोटिक्सचे धडे; इस्त्रोकडून महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रयोगशाळा

By श्रीकिशन काळे | Published: April 22, 2023 4:38 PM

या ठिकाणी सॅटेलाइट, ॲप्लिकेशन ड्रोन, रोबोटिक्स आदींचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत...

पुणे : अंतराळामधील गोष्टींचे निरीक्षण करायचे असेल, स्पेस लॅब रॉकेट सायन्स अनुभवायचे असेल तर आता ते विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. कारण इस्त्रोच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुण्याजवळ पहिली स्पेस एज्युकेशन प्रयोगशाळा सुरू केली आहे. या ठिकाणी सॅटेलाइट, ॲप्लिकेशन ड्रोन, रोबोटिक्स आदींचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.  पुण्याजवळील मुळशी येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये इस्रोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत कलाम माशेलकर स्पेस अँड इनोव्हेशन सेंटरची स्थापना केली असून, या सेंटरचे उद्घाटन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुळशी येथील ही अंतराळ प्रयोगशाळा भारतातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा असून यामध्ये स्पेस लॅब रॉकेट सायन्स, सॅटेलाइट, एप्लिकेशन्स ड्रोन, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी, थ्रीडी प्रिंटिंग, एअरक्राफ्ट्स इत्यादीसारख्या नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर विविध प्रकारचे कार्यक्रम केले जाणार असून लॅबची स्थापना व्योमिका स्पेस अकादमीने इस्रोच्या स्पेस ट्यूटरच्या दृष्टीकोनातून केली आहे. या प्रसंगी इस्रोचे जेष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ टी. एन. सुरेशकुमार, शाळेचे संस्थापक कृष्णा जी भिलारे, संचालक कुणाल भिलारे, शाळेच्या प्रशासकीय व्यवस्थापिका, यशस्विनी भिलारे, गोविंद यादव, कुलगुरू आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रतिक मुणगेकर, प्राचार्या रेणू पाटील, डॉ. पी. के. रजपूत, रवींद्र रसाळ, शिक्षण अधिकारी के. डी. भुजबळ उपस्थित होते.

डॉ. माशेलकरांनी मुलांशी भारतातील अनेक मान्यवरांच्या जडणघडणी विषयी दिलखुला संवाद साधला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झालेली स्वतःची जडणघडण त्याचप्रमाणे भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम, आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उदाहरणे देऊन शिक्षण हेच भविष्य असल्याने भरपूर शिका पण नुसती घोकमपट्टी न करता शोधा, निरीक्षण करा, पहा आणि आत्मसात करण्याचा संदेश ही दिला.या प्रयोगशाळेत चांद्रयान 1, मंगळयान 1 उपग्रह मॉडेलसह SLV 3, ASLV, PSLV, GSLV D1, GSLV MK III, SSLV सारखे ISRO अंतराळ प्रक्षेपकांचे स्केल मॉडेल्सचा अभ्यास इथे होईल. प्रयोगशाळेत दोन दुर्बिणी बसवण्यात आल्या असून, त्याद्वारे अंतराळात घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याशिवाय रोबोट किट, लाईट फॉलोइंग किट, ब्लूटूथ कंट्रोल रोबोट्स, क्वाडकॉप्टर ड्रोन इत्यादी गोष्टी प्रयोगशाळेत पाहता येतील.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडisroइस्रो