पाटेठाण : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्याप्रमाणे सर्व सुखांचा त्याग करत दु:ख सहन करून अमाप शौर्य दाखवत आएएस परीक्षा उत्तीर्ण होऊनदेखील देशसेवेसाठी पदाचा त्याग केला. हा आदर्श विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण कदम यांनी सांगितले. भारताच्या इतिहासातील थोर क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने पिलाणवाडी येथील कदम पाटील इंग्लिश मीडियम शाळेत विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करत अभिवादन करण्यात आले. लक्ष्मण कदम यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सामूहिक अभिवादन करण्यात आले. शाळेतील शिक्षिका पूनम कुलाळ यांनी विद्यार्थ्यांना सुभाषचंद्र बोस यांनी देशसेवेसाठी केलेल्या त्याग व बलिदान याविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सुभाषचंद्र बोस यांची वेशभूषा परिधान केलेला परीक्षित पंडित या विद्यार्थ्यांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी मुख्याध्यापिका सुनीता उपाध्याय, सचिव स्वाती कदम यांच्यासह सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
देशासाठी सुभाषबाबूंनी पदाचा केला त्याग
By admin | Published: January 24, 2017 1:28 AM