पुणे : महापालिकेत स्पष्ट बहुमताने सत्तेवर आल्यामुळे विषय समित्यावर मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व राहिले आहे. विधी समिती वगळता सर्व विषय समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी नव्या नगरसेवकांची नियुक्ती करून पक्षाने नव्यांना चुचकारण्याचे धोरण राबवले आहे.शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण आणि क्रीडा या चार विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. अपेक्षेप्रमाणे त्यात भाजपाच्या नगरसेवकांनी बाजी मारली आहे. शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी सुशील मेंगडे, महिला व बालकल्याणच्या अध्यक्षपदी राजश्री नवले, विधीच्या अध्यक्षपदी माधुरी सहस्रबुद्धे, क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी राहुल भंडारे यांची निवड झाली.सर्व समित्यांमध्ये भाजपाचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी १ असे १३ सदस्य आहेत. भाजपाकडून शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदासाठी सुशील मेंगडे व उपाध्यक्षपदासाठी अजय खेडेकर यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदासाठी भैयासाहेब जाधव आणि उपाध्यपदासाठी लक्ष्मी आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून राजश्री नवले आणि उपाध्यक्षपदासाठी दिशा माने यांनी, तर आघाडीकडून अध्यक्षपदासाठी परवीन शेख आणि उपाध्यक्षपदासाठी चाँदबी नदाफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपाकडून माधुरी सहस्रबुद्धे आणि उपाध्यक्षपदासाठी विजय शेवाळे, तर आघाडीकडून अध्यक्षपदासाठी रत्नप्रभा जगताप आणि उपाध्यक्षपदासाठी रफीक शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहुल भंडारे आणि उपाध्यक्षपदासाठी जयंत भावे, तर आघाडीकडून अध्यक्षपदासाठी वनराज आंदेकर आणि उपाध्यक्षपदासाठी अशोक कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.भाजपाचे सर्व उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे सदस्य निवडणुकीला गैरहजर होते. कृषी विकास प्रकल्प अधिकारी सुशील खोडवेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसचिव सुनील पारखे आदी उपस्थित होते.विषय समित्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पुढीलप्रमाणेशहर सुधारणा समिती : सुशील मेंगडे, अजय खेडेकर -महिला व बालकल्याण समिती : राजश्री नवले, दिशा मानेविधी समिती : माधुरी सहस्रबुद्धे, विजय शेवाळेक्रीडा समिती : राहुल भंडारी , जयंत भावे
विषय समित्यांवर भाजपाच, शहर सुधारणा अध्यक्षपदी सुशील मेंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:56 AM