पुणे : चांदणी चौकातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाकरिता आवश्यक असलेले भूसंपादन करण्याकरिता ५० कोटी रुपये लागणार आहेत. हे ५० कोटी रुपये तुर्तास पालिकेने द्यावेत राज्य शासन हे पैसे पालिकेला देईल असे शासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने ही रक्कम देण्यासंदर्भात स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवला होता. परंतु, समितीने हा प्रस्ताव कार्यपत्रिकेवर घेऊन तुर्तास 'होल्ड'वर ठेवला आहे.
कोरोनामुळे पालिकेचा प्रचंड आर्थिक खर्च झालेला आहे. पालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती पालिकेची झालेली आहे. आजमितीस पालिकेकडे अवघे १४० कोटी शिल्लक आहेत. त्यामुळे कशा कशावर खर्च करायचा असा प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे पीएमपीएमएल प्रशासनाने पालिकेकडे ११० कोटींची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे चांदणी चौक उड्डाणपुलासाठी ५० कोटी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या दोन्हींची बेरीज केली असता १७० कोटी रुपये द्यावे लागतील. एवढी रक्कम देण्याची पालिकेची क्षमता नाही. त्यामुळे हा विषय होल्डवर ठेवण्यात आलेला आहे.
चांदणी चौक उड्डाणपुलासाठी यापूर्वी भूसंपादन झाले आहे. जागा मालकांनी टीडीआर पेक्षाही रोख मोबदला घेण्यास अधिक पसंती दर्शविली. त्यामुळे यापूर्वीच कोट्यवधींचा खर्च झालेला आहे. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता पालिकेला हा खर्च न झेपणारा आहे. त्यामुळे या भूसंपादनाचे पुढे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका पैसे देऊ शकत नसल्याचे चित्र स्पष्ट असल्याने राज्य शासनालाच हे पैसे द्यावे लागतील अन्यथा हा विषय प्रलंबित पडण्याची अधिक शक्यता आहे.
----------
पीएमपीएमएल प्रशासनाने महापालिकेकडे पुढील वर्षीच्या संचालन तुटी करिता एकशे दहा कोटी रुपयांची मागणी केली आहे पालिकेकडून दर महिन्याला संचालन सुट्टीचे रक्कम दिली जाते परंतु पीएमपीएमएल यावेळी संचलन तूट पुढील वर्षीची संचालन तूट आधीच मागितले आहे. पीएमपीएमएल तोट्यात असल्याने तोट्यात आहे. ही वस्तुस्थिती असली तरी पालिका रक्कम आता देऊ शकत नसल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले.