शहरातील इतर पंधरा क्षेत्रीय कार्यालयांपेक्षा ही हे प्रमाण सरासरी प्रमाणापेक्षाही कमी असल्याचे दिसत आहे. तर अनेक कोविड सेंटर आता बंद करण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शहरासह उपनगरांत मृत्यूचे अक्षरशः तांडव प्रत्यक्षात पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी रांगा लागल्या होत्या, तर काही ठिकाणी जागा शिल्लक नसल्याने मृतदेह इतर ठिकाणी घेऊन जावे लागत होते. धनकवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पहिल्यांदाच 'वेटिंग'ची परिस्थिती निर्माण झाली होती. मृत्यूनंतरचा प्रवास सुखाचा असतो, हे वाक्यही खोटे ठरावे, अशी परिस्थिती उपनगरांमधील विविध ठिकाणी निर्माण झाली होती. मात्र मागील आठवड्यापासून यात लक्षणीय बदल झाला आहे.
दरम्यान, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही महिन्यांनंतर पहिल्यांदा फक्त पन्नास साठच्या आत आली आहे. यामुळे आरोग्य विभागासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. कालपर्यंत ३४ हजार ७५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या पाहता साथरोग प्रतिबंधक कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चौकट
पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ३६२२०, मृत ९०८, कोरोनातून मुक्त ३४७५३, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ३७५
प्रतिक्रिया
साथरोग प्रतिबंधक कायद्याला अधिन राहून काम करत असतानाच मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या अचानक कमी झाल्याने त्यामुळे काही कोविड सेंटर अगोदरच बंद झाली असून काही सेंटर बंद होण्याच्या मार्गावर आहेत, ही सर्वांच्याच दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे.- डॉ. सुनील जगताप, साई स्नेह कोविड सेंटर