शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘मिलिसेकंद पल्सार’वरील अनपेक्षित घटनांच्या नोंदी करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:16 AM

पुणे : अवकाशातील प्रचंड घनता असलेले पल्सार हे विलक्षण तारे असून, स्वत:भोवतीच्या प्रत्येक प्रदक्षिणेदरम्यान त्यांच्यामधून रेडिओ लहरींचे झोत ...

पुणे : अवकाशातील प्रचंड घनता असलेले पल्सार हे विलक्षण तारे असून, स्वत:भोवतीच्या प्रत्येक प्रदक्षिणेदरम्यान त्यांच्यामधून रेडिओ लहरींचे झोत बाहेर पडतात. या रेडिओ लहरींच्या झोतांचा (पलसेसचा) कालावधी आणि आकारात अतुलनीय स्थिरता आहे. त्यांच्या अत्यंत स्थिर वर्तनामुळे कमी वारंवारिता असलेल्या गुरुत्व लहरी शोधण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. इंडियन पल्सार टायमिंग आरे (आयएनपीटीए) साठी काम करणाऱ्या ४० खगोलशास्त्रांच्या गटाला अपग्रेडेड जायंंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीचा (यूजीएमआरटी) वापर करून प्रथमच ‘मिलिसेकंद पल्सार’मध्ये अनपेक्षित घटनांच्या स्पष्ट नोंदी करण्यात यश मिळाले आहे.

पल्सेसचा स्थिर आकार ही त्यांची ओळख असून, घड्याप्रमाणे त्यांची ठरावीक काळाने होणारी हालचाल तंतोतंत मोजण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पल्सारच्या संकलनासाठी या वेळांची आवर्तने मोजणे हे नजीकच्या भविष्यात नॅनो हर्टझ गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात गरजेचे आहे. पल्सार कमी वारंवारतेच्या रेडिओ लहरींंमध्ये तेजस्वी दिसतात. यूजीएमआरटी ही पुण्यापासून ८० किमी असणारी दुर्बिण अशा प्रकारच्या रेडिओ लहरी मोजण्यासाठी सक्षम असलेल्या जगातील मोठ्या दुर्बिणीपैकी आहे. अशाप्रकारे पल्समधील अत्यंत सूक्ष्म बदलही यूजीएमआरटीच्या साहाय्याने बघू शकतो. यूजीएमआरटीद्वारे नॅनोहर्टझ गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी इंडियन पल्सार टायमिंग आरे (आयएनपीटीए)कडून सातत्याने पल्सारच्या एका गटावर लक्ष ठेवले जात आहे. आयएनपीटीए हे विविध संस्थांमधील भारतीय व जपानी खगोलशास्त्रांच्या सहकार्याने काम करत आहे. पलसार्सच्या ज्या गटाचा अभ्यास केला जात आहे. त्या गटामधील पीएसआर जे १७१३ ०७४७ हा पल्सार सर्वात विश्वसनीय कालमापकांपैकी एक आहे. एप्रिल आणि मे २०२१ दरम्यान आणि त्यानंतर सुरू असलेल्या निरीक्षणांमध्ये या ताऱ्यात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे दिसत असून, त्याची वैशिष्ट्यपूर्ण लय आणि कालबद्ध वर्तन बदलले असल्याचा सबळ पुरावा मिळाला आहे. या बदलांचा मागोवा घेण्यासाठी आयएनपीटीए गटाने या पल्सारचे सातत्याने निरीक्षण केले. मंथली नोटिसेस ऑफ रॉयल अँस्ट्रॉनॉमिकल सोसायटी लेटर्स’ या जनर्लमध्ये रॅपिड कम्युनिकेशन म्हणून हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.