फडतरे नॉलेज सिटी कळंब-वालचंदनगर येथे ( दि.१६ रोजी) करिअर मार्गदर्शन, तसेच बदलते शैक्षणिक धोरण व पालकांसमोरील संधी व आव्हाने या विषयांवर विद्यार्थ्यांकरिता व पालकांकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ.अरुण मुरलीधर इंगळे सदस्य अभ्यास मंडळ मानव संसाधन विकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. इंगळे यांनी विद्याथ्यार्ंसाठी कोणकोणत्या नवीन करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसाठी कोणते वेगवेगळे शिक्षणाचे बहुपर्याटी मार्ग खुले होणार आहेत याविषयी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. विशेषत: इ.१० वी, १२ वी.पॉलीटेक्निक.आयटीआय फार्मसी कॉलेज ज्युनियर कॉलेजचे असे सर्व विभागचे विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. त्यांचे स्पर्धा परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षाविषयी मार्गदर्शन केले व तसेच अभ्यास कसा करायचा, वेळेचे नियोजन कसे करायचे व परीक्षांना यशस्वीरीत्या कसे सामोरे जायचे, याचे ज्ञान दिले.
संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे, डॉ. शैलजा फडतरे, श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापिका अनिता भाटिया, पॉलीटेक्निकचे प्राचार्य नागेश ठोंबरे, आयटीआयचे प्राचार्य अनिल तांबे, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य धनश्री जमदाडे उपस्थित होते. आभार अमोल कणसे सर यांनी मानले मार्गदर्शन व करिअर मेळावा आयोजित केल्याबद्दल पालकवर्गातून समाधान व्यक्त झाले.
कळंब येथील फडतरे नॉलेज सिटीमध्ये विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
१६०१२०२१-बारामती-०३