या परीक्षेसाठी विद्यालयातील ४६ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी ३४ विद्यार्थी पास झाले तर त्यांपैकी १५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. सृष्टी संतोष मटाले, अर्चना अमरबहादूर निषाद, वैष्णवी कैलास गुंजाळ, अमरीन अजीम शेख, प्रसाद वसंत पिंगट, शिवानी कैलास आरोटे, संस्कृती निवृत्ती देवकर, साक्षी प्रमोद पोटे, स्नेहा प्रमोद गुंजाळ, आकाश सोपान खराडे, स्नेहा संदीप बोरचटे, चैत्राली भागचंद्र पिंगट, शेजल संतोष खराडे, शुभश्री संतोष पोपळघट, तनुजा मोहन मंडले हे विद्यार्थी पात्र झाले.
या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख के. डी. विधाटे, एन. आर. मुळूक, व्ही. ए. गोसावी, एस. बी. बांगर, व्ही. बी. पांडे यांचे मार्गदर्शन लागले. या सर्व विद्यार्थ्यांना ४ वर्षांसाठी प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन शिक्षकांचे अभिनंदन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
230821\img-20210820-wa0198.jpg
बेल्हा(ता.जुन्नर)येथील श्री बेल्हेश्वर विद्यालयातील शिष्यवृतीस पात्र विद्यार्थी व शिक्षक दिसत आहेत.