शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

....परंपरेला छेद देत तो झाला सनदी लेखापाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 7:00 AM

घरातील परिस्थिती बेताची. कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी सुनीलचे वडील श्यामराव निंबाळकर हे गावोगावी भटकंती करीत चाळणी व पत्र्याचे डबे विकायचे....

ठळक मुद्देवैदू समाजातील सुनील निंबाळकरची यशोगाथा : ग्रामस्थांकडून सत्कार, वाजतगाजत काढली मिरवणूक 

गोरख जाधव- बारामती : गावोगावी भटकंती करीत छोटे-मोठे व्यवसाय करण्याची वैदू समाजाची परंपरा. मात्र, या परंपरेला छेद देत आणि घरातील अठराविश्वे दारिद्र्यावर मात करीत डोर्लेवाडी येथील एका युवकाने शिक्षणाची वाट धरली. कुटुंबीयांचा पाठिंबा आणि जिद्दीच्या जोरावर त्याने सनदी लेखपाल पदाला गवसणी घातली आहे. डोर्लेवाडी येथील सुनील निंबाळकर असे या युवकाचे नाव असून वैदू समाजातील तो पहिलाच लेखापाल ठरला आहे...  घरातील परिस्थिती बेताची. कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी सुनीलचे वडील श्यामराव निंबाळकर हे गावोगावी भटकंती करीत चाळणी व पत्र्याचे डबे विकायचे. ‘शिकणं म्हणजे निव्वळ वेळ वाया घालावणं; आता लगिन झालंय कयतरी कामाधंद्याचं बघा,’ असा सल्ला देणारे अनेक जण सुनीलच्या अवतीभवती होते. मात्र, सुनीलने कुटुंबाचा विश्वास जिंकला होता. आई-वडील आणि बायकोच्या खंबीर पाठिंब्यावर त्याने शिक्षणाची कास सोडली नाही. तोकड्या कमाईत श्यामराव यांनी सुनीलच्या शिक्षणाचा खर्च भागवला. तर, समाजिक चालिरीतींमुळे २०१६मध्ये सुनील याचाही वयाच्या २३व्या वर्षी विवाह उरकला. एकीकडे सांसारिक जबाबदारी पडली, तरीही उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सुनीलने शिक्षण सोडले नाही. संसाराची जबाबदारी पडल्याने ‘आता शिकून काय करणार? कामाधंद्याचे पाहा,’ असा फुकटचा सल्ला देणारेही कमी नव्हते. मात्र, कुटुंबाचा असणारा भरभक्कम पाठिंबा सुनीलचे बळ वाढवत गेला. पुण्यात उच्च शिक्षणासाठी असताना त्याने केंद्रीय लोकसेवा आयोग इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. प्रचंड मेहनत घेत सुनील सनदी लेखापाल झाला. आपला मुलगा नेमकं काय शिकला, याची माहितीही नसलेले आई-वडील मात्र सुनीलच्या यशावर खूष आहेत. ‘त्याला जे पाहिजे होतं ते त्याला मिळालं, ह्योच आमचापण आनंद,’ असं त्याचे वडील म्हणतात. ........................आई-वडिलांचा अभिमान...घरची परिस्थिती अतिशय बेताची; परंतु संकटावर मात करीत त्याने बीकॉमची पदवी घेतली. निरंतर अभ्यास करून सनदी लेखपालपदी मजल मारली. या यशाबद्दल सुनीलच्या आई-वडिलांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डोर्लेवाडी ग्रामपंचायतीने सुनीलचा जाहीर सत्कार केला. समाजातील पहिलाच मुलगा उच्चशिक्षित झाल्याने समाजातील नागरिकांनी  सुनीलची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून त्याचे कौतुक केले. 

टॅग्स :Baramatiबारामती