असे प्रकार राष्ट्रवादीत खपवून घेतले जाणार नाहीत; मारहाणी प्रकरणावरून अजितदादांचा चांदेरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:12 IST2025-01-27T15:10:09+5:302025-01-27T15:12:16+5:30
बाबुराव चांदेरेशी बोलून मारहाण केल्याबाबतचा जाब विचारणार आहे, त्या व्यक्तीने तक्रार दिली तर नक्की कारवाई होईल

असे प्रकार राष्ट्रवादीत खपवून घेतले जाणार नाहीत; मारहाणी प्रकरणावरून अजितदादांचा चांदेरेंना इशारा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त कृतीने राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. चांदेरे यांनी पुण्यात एका काल शनिवारी 25 जानेवारी ला नागरिकाला मारहाण केल्याची माहिती संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता, मारहाण झालेल्या व्यक्तीला डोक्यावर आणि गुडघ्याला जखम झाली होती. त्यानंतर आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार मारहाण आणि शिवीगाळ या घटनामुळे बाबुराव चांदेरे चर्चेत येतात. एका नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, या घटनेनंतर अजित पवारांच्या पक्षासह बाबुराव चांदेरे यांच्यावर टीका केली जात आहे. या घटनेवरती अजित पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता, त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे. की, जो प्रकार झाला आहे, ते मला आवडलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.