वर्दळीचा असलेला हा राष्ट्रीय महामार्ग परंतु सध्या जुन्नर तालुक्याच्या हद्दित मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. मोठमोठे वृक्ष एकतर तोडले जातात किंवा पेटून दिले जातात. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे. दररोज या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत आहे.
तसेच या अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी महिन्यात सहा-सात लहान मोठे अपघात होत आहेत. त्यामध्ये काहीजण गंभीर जखमी झालेत. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने समोरून आलेली वाहने दिसत नाहीत. अतिक्रमण झालेल्या दुकानांच्या समोरच ग्राहकांची वाहने उभी असतात त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पिंपरी पेंढार ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमणे राेखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नारायणगाव येथील कार्यालयात तीन वर्षांपूर्वी लेखी पत्र दिले आहे. परंतु अद्यापही बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग अतिक्रमणावर कारवाई करत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन अतिक्रमण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर त्वरित कारवाई न केल्यास भविष्यात महमार्गावर असणारे सर्व मोठमोठे वृक्ष नाहीसे होतील.
फोटो- कल्याण-नगर या राष्ट्रीय महामार्गावर असणारे १०० वर्षांचे वडाचे झाड आगीच्या भक्षस्थानी.