शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

अशी रंगली शर्यत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 2:29 AM

पहाटेच्या गारव्यामुळे प्रारंभी खेळाडूंना फारसा थकवा जाणवला नाही.

पहाटेच्या गारव्यामुळे प्रारंभी खेळाडूंना फारसा थकवा जाणवला नाही. त्यांनी वेगवान प्रारंभ केला. मुख्य शर्यतीला प्रारंभ झाल्यानंतर इथिओपियाच्या पाच धावपटूंनी आघाडी घेतली. पहिले ५ किलोमीटर आणि त्यानंतर १२ किलोमीटरपर्यंत हेच धावपटू आघाडीवर होते. त्यांच्या जथ्याने इतर स्पर्धकांना बऱ्यापैकी मागे टाकले होते. बाणेर रोडमार्गे कमलाकर चौक आणि पुढे सदानंद हॉटेलपर्यंत या ५ पैकी एक जण मागे पडला. अ‍ॅटलॉ डेबेबे, गतविजेता गेताचेव बेशा आणि असेफा बेकेले अबेले यांचा आघाडी घेणाºया जथ्यामध्ये समावेश होता.बाणेर परिससरानंतर खेळाडू म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळून टेनिस स्टेडियम, बॅडमिंटन स्टेडियममार्गे हायवेला लागून असलेल्या गेटमधून बाहेर पडले. दरम्यान, आघाडीवर असलेल्या जथ्यातील एक खेळाडू मागे पडला.डेबेबे, बेशा आणि अबेले हे इथिओपियन त्रिकूट क्रीडा संकुलातून एकत्र बाहेर पडले. त्यानंतर सिमन्स कंपनीमार्गे शर्यत पुढे मार्गस्थ झाली. परतीच्या मार्गावर कळमकर चौकातून पुणे-बंगळुरू महामार्गावरील महाबळेश्वर हॉटेलच्या ३० किमीच्या टप्प्यात आघाडीवर असलेले इथिओपियाचे त्रिकूट आणि चौथा खेळाडू यांच्यात सुमारे ६०० ते ७०० मीटरचे अंतर पडले होते.चौथ्या क्रमांकाचा खेळाडू हे अंतर कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. मात्र, सावित्रीबार्ई फुले पुणे विद्यापीठाच्या टप्प्यापर्यंत हे अंतर आणखी वाढले. थकल्यामुळे तो खेळाडू आघाडीवरील त्रिकुटाला गाठू शकला नाही. मग डेबेबे, बेशा आणि अबेले यांच्यात विजेतेपदासाठी शर्यत रंगली. दरम्यान, अनेक ठिकाणी पुणेकर खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. शिवाजीनगर परिसरातील आकाशवाणी चौकापासून आघाडीवर असलेल्या त्रिकुटात अंतर पडायला प्रारंभ झाला. जंगलीमहाराज रस्त्यामार्गे शर्यत बालगंधर्व रंगमंदिरापासून डेक्कन पीएमटी स्टॉपकडे निघाल्यानंतर तिघांचाही वेग वाढला. संभाजी पुलावरून शर्यत टिळक रस्त्यावर येईपर्यंत डेबेबे याने इतर दोन सहकाºयांना मागे टाकले होते.अखेरच्या टप्प्यात गतविजेता बेशा याने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजेतेपद पटकावण्याचा निर्धार केलेल्या डेबेबेचा वेग तो गाठू शकला नाही. सणस मैदानातील फिनिशिंग लाईन जवळ येताच डेबेबेचा वेग आणखी वाढला. गिरीजा हॉटेलमार्गे सणस मैदानाकडे उत्साहात कूच करून त्याने दिमाखात फिनिशिंग लाईन पार केली. बेशाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर अबेले तिसरा आला.सुमारे १५ हजार धावपटू ३३व्या पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. प्रल्हाद सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘प्रल्हाद सावंत स्मृती रन’मध्ये १५०० ते १६०० धावपटूंनी सहभाग नोंदविला. भारतीय गटामध्ये सहभागी झालेल्या धावपटूंचा उत्साह लक्षणीय होता. शिवाजीनगर परिसरापासून त्यांच्यात जोरदार चुरस रंगली होती.>महापालिकेने निधीत कपात करूनही शर्यत यशस्वीक्रीडा क्षेत्रातील पुणे शहराचा मानबिंदू अशी ओळख असलेली ही शर्यत अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपली असताना पुणे महापालिकेने या शर्यतीसाठी देण्यात येणाºया निधीत कपात करण्याचा निर्णय घेतला. नेहमी या शर्यतीसाठी महापालिका ३० लाख रुपयांचा निधी देत असे. यंदा मात्र तो केवळ १० लाख इतकाच देण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित २० लाख पुणे मॅरेथॉननंतर आठवडाभराने होणाºया एका खासगी मॅरेथॉनसाठी देणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. या शर्यतीत पालिकेचे कर्मचारी सहभागी होणार असून, त्यांच्या प्रवेश फीसाठी ही रक्कम वापरणार असल्याची सारवासारव त्यांनी केली.या प्रकरणात महापालिकेतील सत्ताधारी पक्ष राजकारण करीत असल्याची टीका पुणे मॅरेथॉनचे आयोजक, क्रीडाप्रेमी आणि विरोधी पक्षांनी केली.अलीकडील काही वर्षांत पुणे मॅरेथॉनदरम्यान खेळाडूंना वाहतुकीचा फटका बसायचा. इतरही अडचणी यायच्या. यंदा मात्र पोलिसांनीवाहतूक व्यवस्था समर्थपणे हाताळली. यामुळे शर्यत कोणत्याही अडथळ्याविना पार पडली.प्रत्येक किलोमीटरच्या टप्प्यावर किमान २ स्वयंसेवक खेळाडूंसाठी पाणी, संत्री, मोसंबी, केळी अशी फळे आणि ज्यूस घेऊन उभे होते. पुणे महापालिकेने निधी कमी केला असला तरी अलीकडील इतर शर्यतींपेक्षा ही शर्यत जास्त यशस्वी ठरली, अशी चर्चा पारितोषिक वितरणाला उपस्थित असलेले स्पर्धक आणि पुणेकरांमध्ये रंगली होती.