पुणे : विठू नामाचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाेबत लाखाे वारकऱ्यांनी शनिवारी सकाळी अाळंदीतून प्रस्थान केले. वाटेत विविध सामाजिक संस्था या वारकऱ्यांना विविध प्रकारची मदत करत हाेते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने वारकऱ्यांच्या तुटलेल्या चपला शिवून दिल्या तसेच बॅगांची तुटलेली चेनसुद्धा माेफत दुरुस्त करुन देण्यात अाली.
शनिवारी सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे अाळंदीतून प्रस्थान झाले. पालखीसाेबत लाखाे वारकरी पुण्याच्या दिशेने निघाले. यावेळी चालताना तुटलेल्या चपला तसेच बॅगांची तुटलेली चेन दुरुस्त करण्याचे काम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात अाले. अनेक वारकऱ्यांनी अापल्या चपला दुरुस्त करुन घेतल्या तसेच महासंघाच्या स्वयंसेवकांना अाशिर्वाद दिला. ज्ञानेश्वरांची पालखी जेथे विसाव्यास थांबते तेथे फुलेनगर येथे ही वारकऱ्यांची सेवा करण्यात अाली.
गेल्या साेळा वर्षांपासून महासंघाचे स्वयंसेवक वारीत येणाऱ्या वारकऱ्यांची कुठलीही अपेक्षा न ठेवता सेवा करतात. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या गटई कामगार सेलचे शहर उपाध्यक्ष नवनाथ हेळकर म्हणाले, साेळा वर्षापूर्वी वारकऱ्यांची सेवा करावी असा विचार मनात अाला. अाळंदी ते पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या तुटलेल्या चपला दुरुस्त करुन देणे ही अामच्याकडून वारकऱ्यांची केलेली सेवा अाहे. वारकरी अाम्हाला अाशिर्वाद देऊन माेठं काम केलं असं म्हणतात. दरम्यान मार्गात विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे वारकऱ्यांना बिस्किट, चहा, गुडदाणीचे वाटप करण्यात अाले. काहींनी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे अायाेजन केले हाेते. तर ठिकठिकाणी विविध अाराेग्य संस्थांतर्फे वारकऱ्यांना अाराेग्य सेवा देण्यात अाली.