पिंपरी : जगणे असह्य झाले म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रूपीनगर येथे रविवारी उघडकीस आली. एवढेच नव्हे तर गळफास घेतल्याचा त्याने मोबाईलवर सेल्फी सुद्धा घेतला आहे. विनोद रमेश गोसावी (वय १९, रा. रुपीनगर, तळवडे, मूळ रा. शहादा, नंदुरबार)असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या राहत्या घरात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याने जीवनाचा कंटाळा आला म्हणुन आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि त्याचा भाऊ चिंचवडमधील एका कंपनीमध्ये कामास होते. शनिवारी सकाळी दोघेही कामावर गेले. पहिल्या शिफ्टनंतर दुपारी विनोद घरी आला. मात्र, त्याच्या भावाला दुसऱ्याही शिफ्टला थांबावे लागले. रात्री शिफ्ट संपल्यानंतर भाऊ घरी आला. त्याने घरी आल्यानंतर दरवाजा वाजवला. मात्र, घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घराचा दरवाजा तोडला. घरात प्रवेश केला त्यावेळी विनोद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. चादरीची कडा कापून त्याच्या साहाय्याने विनोदने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कंपनीमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे विनोदच्या भावाने मोबाईल घरीच ठेवला होता. त्या मोबाईलमध्ये विनोदने गळ्याला गळफास लावून सेल्फी काढला. तसेच त्याने एक चिट्ठी लिहून ठेवली आहे. त्यात आत्महत्येचे कारण नमूद केले आहे.
पिंपरीत जीवनाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:15 IST
जगणे असह्य झाले म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रूपीनगर येथे रविवारी उघडकीस आली.
पिंपरीत जीवनाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
ठळक मुद्देमोबाईलमध्ये विनोदने गळ्याला गळफास लावून सेल्फी काढला.