बारामती: बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट तसेच तज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर व प्रीतम पहाडे या चौघांनी गुरुवारी (दि ६)अचानक राजीनामे दिले आहेत.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी राजीनामे दिल्याची चर्चा आहे. बँकेचे चेअरमन सातव यांच्या नेतृत्वाखाली मागील आर्थिक वर्षात बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली. बँकेचा एनपीए लक्षणीयरीत्या खाली आणला. बँकेला आजपर्यंतचा विक्रमी ढोबळ नफा झाला.तसेच ७ कोटी ९० लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे .या यशाबाबत चेअरमन सातव यांनी गुरुवारी(दि ५) माध्यमांना माहिती देखील दिली. बँकेच्या यशाचे कौतुक होतं असतानाचं चौघांच्या राजीनाम्याची बातमी धडकली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
२७ डिसेंबर २०२१ रोजी विद्यमान चेअरमन ,व्हाईस चेअरमन यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांनंतर अवघ्या १५ महिन्यांनी राजीनामे घेतले आहेत. पवार यांनी नवीन पदाधिकारी निवडीसाठी हे राजीनामे घेतल्याची चर्चा आहे. अध्यक्षपदी सचिन सातव यांना कायम ठेवून मात्र उपाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.