वडगावशेरी, खराडी, चंदननगर, विमाननगर, लोहगाव या परिसरात रुग्ण संख्या दररोज सरासरी 500 हुन अधिकने वाढत आहे. ती पुणे शहरातील इतर भागांच्या तुलनेत अव्वल आहे आणि सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ही वाढीची संख्या भीतीदायक आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी एकीकडे महापालिका विविध यंत्रणा कार्यान्वित आहे. परंतु जम्बो हॉस्पिटल, ससून या ठिकाणे बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात पळापळ करायला लागत आहे. मात्र नामांकित खासगी रुग्णालयात कोविडचे बेड सहजरीत्या उपलब्ध होत नाही.
दोन दिवसांपूर्वी रामवाडी गावातील अरूलमेरी अॅन्थनी व मुलगी आरकीदास अॅन्थनी या दोघांना कोरोनाची लागण झाली. या अरूलमेरी यांनी बुधवारी रात्री श्वसनाचा त्रास होऊ लागला मुलगा आरकीदास रात्रीपासून जम्बो कोविड सेंटर, ससून रुग्णालय, वडगावशेरी परिसरातील खासगी रुग्णालयांत बेड शोधत होता. मात्र बेड मिळाला नाही अखेर बेड शोधत असतानाच आरकीदासच्या आईने आरूलमेरी यांनी जीव सोडला. कोरोना रुग्णसंख्या एवढी वाढली आहे की कोणत्याच हॉस्पिटलमध्ये बेडच उपलब्ध होत नाहीत.